मा. आयुक्त श्री. कैलास पागरे महिला व बालविकास विभाग नवी मुंबई यांची रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागातील अंगवाडी भेट.
दि . १ नोव्हेंबर रोजी मा. कैलास पगारे सर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना व मा. विजय क्षीरसागर सर यांनी रायगड जिल्ह्यातील पेण, सुधागड व खालापूर तालुक्यातील प्रधानमंत्री जनजाती अभियान अंतर्गत ( पीएम-जनमन) अंगणवाडी केंद्राना भेट देऊन अंगणवाडी कामकाज बाबत माहिती घेतली तसेच आदिवासी विकास विभागाच्या बहुउद्देशीय केंद्राची पाहणी करून आदिवासी वाडीवरील ग्रामस्थानसोबत संवाद साधला. पेण तालुक्यातील मालवाडी या आदिवासी वाडीवरील अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन मा. आयुक्त सरांच्या शुभहस्ते करण्यात आले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .
लेक लाडकी योजना पात्र लाभार्थी ना धनादेश वाटप, मातृ वंदना योजना पात्र लाभार्थी ना पहिला हप्ता वितरण प्रमाणपत्र वाटप, बेबी केअर किट वाटप , अंगणवाडीतील बालकांना विद्यारंभ प्रमाणपत्र वाटप, गरोदर माता ओटीभरण , ६ महिने पूर्ण बालकाला अन्नप्राशन कार्यक्रम, नवचेतना मेळावा, आधार कॅम्प आयोजन तसेच पोषण माह २०२५ मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या सेविका/ पर्यवेक्षिका यांचा सत्कार मा . आयुक्त सरांच्या हस्ते करण्यात आला. अंगणवाडी बालकांच्या नावाने विविध फळझाडे लाऊन वुक्षारोपण केले. खालापूर तालुक्यातील सक्षम किट प्राप्त अंगणवाडी केंद्राला भेट देऊन सक्षम किट मधील साहित्य व इन्स्टॉलेशन ची माहिती घेतली . सुधागड बालविकास कार्यालय मार्फत vocal for local या संकल्पनेवर आधारीत सेविकामार्फत तयार केलेल्या पाककृती पुस्तिकेचे मा. आयुक्त सर यांनी विशेष कौतुक केले.
१००० दिवस बाळाचे या पुस्तकाचे वितरण गरोदर माता , सरपंच यांना करण्यात येऊन बाळाच्या योग्य पालन पोषणासाठी पहिल्या १००० दिवसांचे महत्त्व समजाऊन सांगत अंगणवाडी सेविकांनी याबाबत जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करणेबाबत आवाहन केले .
सदर भेटीदरम्यान निर्मला कुचिक जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद रायगड , तेजस्विनी गलांडे प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग पेन, प्रविण पाटील बालविकास प्रकल्प अधिकारी पेन, तेजस्विता करंगुटकर बालविकास प्रकल्प अधिकारी सुधागड, विशाल कोटागडे बालविकास प्रकल्प अधिकारी खालापूर तसेच बेलवडे व सिधेश्वर बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.