पंचायत समिती खालापूर
पंचायत समिती खालापूर
1.पंचायत समिती परिचय
तालुक्याचे नांव – खालापूर, जिल्हा – रायगड,
एकुण लोकसंख्या 2020-11 प्रमाणे
ग्रामीण – 1,11,500
शहरी – 95,964
एकुण – 2,07,464
एकुण गावे – 136
एकुण ग्रामपंचायत संख्या – 45
विभागाची नांवे
प्रशासन विभाग
आरोग्य विभाग
प्राथा्रमिक आरोग्यकेंद्र – 4 उपकेंद्र – 18
खालापूर बीड,कुभिवंली,काढरोली,जांबरूग,होनाड,उंबरे,माणकिवली
चौक चौक,हातनोली,कलोते,मोकाशी,बोरगांव
लोहोप लोहोप,वाशिवली,वांसाबे,मोहोपाडा,रिस
वावोशी वावोशी,उसरोली
ग्रामीण रुग्णालय – चौक
पशुसंवर्धन विभाग
पशुवैदयकीय दवाखाने – श्रेणी-1 :- वावोशी,चौक,मोहोपाडा
पशुवैदयकीय दवाखाने – श्रेणी-2 :- खोपोली,उंबरे,
लघु पशु सर्व चिकित्सालय – खालापूर
शिक्षण विभाग
एकुण प्राथमिक शाळा – 167 (फक्त जि.प.शाळा)
इयत्ता 1 लीते 5वी -133 विदयार्थी संख्या -मुले 1766 ,मुली – 1740 , एकुण- 3506
इयत्ता 6 वी ते 8 वी -133 विदयार्थी संख्या -मुले1261 ,मुली – 1342 , एकुणज्ञ् 2603
इ.1 लीते 5 वी सर्व शाळा अनु.जाती विदयार्थी -1381,अनु.जमाती विदयार्थी -3614,अल्पसंख्या -1959 इतर-10300 एकुण -17254
इ.6 वी ते 8 वी सर्व शाळा अनु.जाती विदयार्थी -1071,अनु.जमाती विदयार्थी -1366,अल्पसंख्या -961 इतर-5172 एकुण -8570
कनिष्ठ प्राथमिक शाळा -145 वरिष्ठ प्राथमिक शाळा -52 एकुण माध्यामिक शाळा – 51
कनिष्ठ माहाविदयालये -02 वरिष्ठ माहाविदयालये – 00 नगरपालिका प्राथमिक शाळा – 21
आश्रम शाळाखाजगी अनुदानीत – 0 प्राथमिक शाळाखाजगी अनुदानीत -06 शासकिय आश्रम शाळा -01
एकात्मिक बालविकास सेवा योजना
अंगणवाडी सेख्या -165 इमारती संख्या -145
मीनी अंगणवाडी संख्या -31 इमारती संख्या -06
ग्रामपंचायत विभाग
ग्रामपंचायत संख्या -45 ग्रुप ग्रामपंचायत संख्या -35 स्वतंत्र ग्रामपंचायत संख्या -10 महसुल गावे -136एकुण वाडया -87
एकुणहातपंप संख्या -135 (समाविष्ट ग्रा.पं.29) एकुण विदयुतपंप संख्या -08 (समाविष्ट ग्रा.पं.08)
प्रादेशिक न.पा.पु.योजनाचीसेख्या (मजिप्रा) 01 समाविष्ट ग्रा.प.2)
कृषी विभाग
भात पीकाखालीलक्षेत्रखरीपहंगाम -2850 हेक्टर रब्बी हंगाम -500 हेक्टर
एकुणकडधान्य क्षेत्रखरीपहंगाम -25 हेक्टर रब्बी हंगाम -30 हेक्टर
भाजीपाला क्षेत्रखरीपहंगाम -225 हेक्टररब्बी हंगाम -230 हेक्टर
फळबाग लागवड व इतरक्षेत्र – 925 हेक्टर जंगलाखलीलक्षेत्र -13936.08 हेक्टर
ग्रामीण पाणीपुरवठा उप विभाग – या उपविभागामार्फततालुक्यातील प्रत्येकग्रामीण घर ,शाळा अंगणवाडी,यांना पुरेसे व शाश्वत पिण्याचे पाणीसुनिश्चित करण्यासाठीकामकरते .जिल्हास्तरावरूनमंजुर झालेल्या पाणीपुरवठा योजनांचीतालुकास्तरावर अंमलबजावणी करणे.
2. उदिदष्टे आणि कार्य
उदिदष्टे
1) स्थानिय विकासाला गतीमानकरणे – ग्रामपंचायतीच्या स्तरावर बनलेल्या विकास योजनाना एकत्रित करणे ,त्यांची प्राथमिकता निश्चित करणे व वास्तवात रुपांतर करण्याचेकाम पंचायत समितीकरते
2) लोकशाही विकेंद्रकरणात मध्यस्थ भुमिका – पंचायत समितीग्रामपंचायती व जिल्हा परिषद याच्या दरम्यान एक महत्वाचा दुवा असुन स्थानिक प्रशासन अधिक सामर्थ्यवान आणि सर्व समावेशक बनवते
3) सामाजिक न्याय संगत कार्यक्रम अंमलात आणणे – अनुसुचित जाती , अनुसुचित जमाती महिला बालक ,दुर्बल घटकांसाठी सामाजिककल्याण योजनाचा समावेश
4) सामुदायिकभागीदारी व क्षमता निर्माण करणे – ग्रामीण भागातील लोक व स्थानिक घटकांच्या भागीदारीने कार्यन्वित होणारे विकास उपक्रम त्यांना सामुदायिक सहभागातून सक्षमकरणे
5) तक्रार निवारण करणे – पंचायत समिती ग्रामविकास विभागाकडील शासन परिपत्रक दि.3 मार्च 2020 अन्वये तालुक्यातीललोकांच्यातक्रारी / गाऱ्हाणी /अडचणी सोडवण्याच्या दृष्टिने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी 11.00 वाजता गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात अडचणीची सोडवणूककरण्यातकरता सभा आयोजित करण्यातयेवून लोकांच्या तक्रारीचे निराकरणकरण्यात येते
कार्य
1)नियोजन व समन्वय – ग्रामपंचायतींनीतयार केलेल्या विकास योजनांची समग्र रुपरेषा तयारकरणे ,त्यामध्ये आवश्यकसंसाधने उपलब्ध करणे आणि योजना अंमलबजावणीसाठी व्यवस्थापन करणे
2) विकासात्मक कार्ये – कृषी ,सिंचन,पशुपालन ,मत्स्य पालन , लघुउदयोग, सहकारीक्षेत्रयासारख्याक्षेत्रांमध्येसुधारणाघडविणे,पायाभूत सुविधा – रस्ते पुल सार्वजनिक इमारती आरोग्यतसेच शिक्षण सुविधा पुरविणे
3) सामाजिक सेवा व कल्याण – प्राथमिक शिक्षण, महिलाव बाल विकास, आरोग्य,मोहिम लसीकरण, पोषण ,बालआरोग्य यासंबंधीत कार्यकरणे
4) पर्यवेक्षण – पंचायत समितीग्रामपंचायतीचे बजेट परिक्षण व आवश्यकते बदल घडूवण आणतेतसेच निधी उपयोगिता व प्रगतीयाबाबत नियमित आढावा घेतला जातो
5) प्रशासन व बजेट व्यवस्थापन – कर व इतर शुल्काची वसुली करणेतसेच विविध अनुदानकर्ज स्वयंम निधी ची व्यवस्था व वित्ती व्यवस्थापन करणे
6) आणी बाणी व इतरकार्य – पुर,दुष्काळ,रोगराई यासारख्या आपत्ती परिस्थितीत मदत पुरविणे
3.ध्येय आणि दृष्टी – पंचायत समितीही भारताच्याग्रामीण स्थानिक स्वराज्यसंस्थामधील तालुकास्तरावरील एक महत्वाची संस्था आहेती ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदयांच्यातील दुवा म्हणूनकामकरतेपंचातराजव्यवस्थेतीलही समिती गावाच्या विकासासाठी कामकरते.
ध्येय-ग्रामीण विकास साधने – शिक्षण, आरोग्य , पाणीपुरवठा ,कृषी ,स्वच्छता इ. क्षेत्रातकाम करुनग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणेसामाजिक समावेशक व समानता – समाजातील सर्व घटकांना विशेषत: महिला,अनुसुचीतजाती -जमाती दुर्बल घटक यांना विकास प्रक्रियेत सहभागी करुण घेणे
ग्रामपंचायतीचेसशक्तीकरण-ग्रामपंचायतीना मार्गदर्शन व निधीदेवून त्यांना सक्षम बनविणे
स्थानिकगरजांची पुर्तताकरणे-तालुक्यातील विशिष्टगरजा ओळखुन त्या नुसार योजनातयारकरणे व राबवणे
दृष्टी – स्वावलंबी व सशक्त ग्रामराज्य – असा ग्रामीण भागातील भाग निर्माण करणे जो स्वयंपुर्ण स्वावलंबी व आत्मनिर्भर असेल
गुणवत्तापूर्ण जीवनमान -खेडयातीलग्रामीण भागातील लोकाच्या जीवन शैलीतसकारत्मक बदल घडवून त्यांचे जीवमान उंचावणे
शाश्वत विकास – पर्यावरण पुरक व दिर्घकालीन विकास योजना राबून ग्रामविकास साधणे
तंत्रज्ञानाचा वापर – आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक पारर्दशक ,गतीमान आणि लोकाभिमुख करणे
4. योजना
1) महात्मागांधी राष्ट्रीयग्रामीण रोजगारहामी योजना – ग्रामविकासासाठी पायाभूत सुविधा जसे रस्ते,पाणंद रस्तेतसेच गरीब व बेरोजगार कुंटुबांना रोजगार देण्यात येतो
2) प्रधानमंत्रीआवास योजना (ग्रामीण) – गरीब कुंटुबासाठी पक्की घरे बांधुन देणे घरबाधणी साठी अनुदान देणे.
3) राष्ट्रीयग्रामीण पेयजलकार्यक्रम – स्वच्छ व सुरक्षीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे,हातपंप , बोरवेल, जलशुध्दीकरण प्रकल्प राबविणे
4) एत्कामिक बालविकास सेवा योजना – अंगणवाडी केंद्राव्दारे लहान मुलांचे पोषण शिक्षण व आरोग्य सेवा देणेगर्भवती माता व स्तनदान मातासाठी पोषण आहार देणे
5) कृषीसंबंधीत योजना – शेतकाऱ्यानां प्रशिक्षण देणे,खते व बी-बियाणचे वाटप करणे जलसंधारण ,सेंद्रीय शेती याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहितकरणे .कृषी महोत्सव व कार्यशाळाघेणे.
6) कौशल्य विकास व स्वयंरोजगार योजना – युवासाठी प्रक्षिण व स्वयंरोजगार संधी (CMPKY)महिलासाठी बचत गट व उदयोजक्ता
5 .प्रशासकिय व्यवस्थापन
1) विकास योजनातयारकरणे- ग्रामपंचायतीकडून आलेल्या मागण्या संकलीत करुन विकास आराखडाकरणे. योजनांचीतालुका पातळीवर अंमलबजावणी करणे.
2) शासकीय योजना राबविणे – केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना (जलजीवन मिशन ,प्रधानमंत्री आवास योजना ) प्रभाविपणे अंमलात आणणे.
3) ग्रामपंचायताचे मार्गदर्शक- ग्रामपंचायतीच्या कारभारावर देखरेख व मार्गदर्शनकरणे प्रशिक्षणकार्यक्रमाचे आयोजनकरणे
4) विभाग प्रमुखाशी समन्वय – शिक्षण,आरोग्य,कृषी ,महिला बालकल्याण ,पशुसंवर्धन इ. विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे
5) ग्रामसभा व विशेष सभा नियोजन- ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये घेतलेल्या ठरावावरपंचायत समिती स्तरावर निर्णय घेणे विशेष प्रकल्पासाठी सभा बोलवणे
6) नियंत्रण व लेखा परिक्षण – अनुदानाचा वापर योग्य पध्दतीनेहोत आहे कि नाही यावर नियंत्रण ठेवणे खर्चाचे ऑडिटकरणे
6 .पुरस्कार- पंचायत समिती स्तरावर प्रशासकीयकार्यक्षमता ,विकासयोजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि नवोपक्रम यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या वतीने विविध पुरस्कार दिले जातात या पुरस्कारचा उददेश पंचायत समितीच्या कामगिरीलाप्रोत्साहनदेणे,प्रेरणा देणे आणि चांगल्या कामगिरीची दखल घेणे
राज्यस्तरीय ग्रामविकास विभागाचे पुरस्कार – उत्कृष्ट पंचायत समिती पुरस्कार,आदर्श पंचायत समिती पुरस्कार ,स्वच्छता व महिलासक्षमीकरण यांसाठी विशेष पुरस्कार
मिशन अंत्योदय पुरस्कार – (केंद्रसरकारच्या ग्रामविकास मंत्रालयामार्फत) -सर्वांगीण ग्रामविकासाठी योगदान दिलेल्या समित्यांना सन्मान देणे
स्वच्छ भारत अभिायान अंतर्गत पुरस्कार-ग्रामीण स्वच्छतेसाठी योगदान
पंचायत समितीतालुक्यातीलग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता वाढीस लावली असल्यास पुरस्कार
स्थानिय शासनातील नवोपक्रमासाठी पुरस्कार – ई-गव्हर्नन्स, डिझिटलायेशन, लोकसहभाग वाढविण्याचे उपक्रम
यशवंत पंचायत राज अभियान – दरवर्षी उत्कृष्टकामगिरीकरण्याऱ्या जिल्हा परीषद व पंचायत समिती यांना पुरस्कार दिले जातात