छायाचित्र दालन
प्रा आ केंद्र नेरे पनवेल येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अंतर्गत महाशिबिराचे व रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रा आ केंद्र नेरे पनवेल येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अंतर्गत महाशिबिराचे व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन मा. आ श्री. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पार पडले.
शिबिरास मा. श्री. किसन जावळे जिल्हाधिकारी रायगड,
मा. श्रीम. नेहा भोसले मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड यांनी भेट देऊन मोलाचे मार्गदर्शन केले.
आज शिबिरात त्वचारोग तज्ञ,मेडिसिन तज्ञ,बालरोग तज्ञ,स्त्रीरोग तज्ञ,अस्थिरोग तज्ञ,नेत्र विकार तज्ञ,कान नाक घसा तज्ञ,दंत रोग तज्ञ यांच्याकडून तपासणी करण्यात आली व नियमित लसिकरण करण्यात आले.रक्त तपासणी,क्ष-किरण,रक्तदाब,मधुमेह,स्तन आणि गर्भाशय मुख व मुख कर्करोग तपासण्या मोफत करण्यात आल्या.आभा व आयुष्यमान काढून वाटप करण्यात आले.सदर शिबिराचा ५४१ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
शिबिरास मा. आ. श्री. विक्रांत पाटील ,मा. आ श्री. सुनिल राणे,
श्री. जितेंद्र इंगळे अप्पर तहसिलदार पनवेल,
श्री. समीर वाठारकर गट विकास अधिकारी पनवेल व पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. अपर्णा पवार
तालुका आरोग्य अधिकारी पनवेल, वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी वर्ग प्रा. आ. केंद्र नेरे पनवेल ह्यांनी शिबिर यशस्वी रित्या पार पाडले.
मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान ग्रामविकास व पंचायत राज विभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग 2025
मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान ग्रामविकास व पंचायत राज विभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग 2025